नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त !

प्रतीकात्मक छायाचित्र

नौपाडा (ओडिशा) – छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवरील नौपाडा या ओडिशा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. यात काही सैनिक घायाळ झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाची ७ सैनिकांची तुकडी भैंसदानी येथील जंगलात चालू असलेल्या रस्त्याच्या कामाला संरक्षण देण्यासाठी जात होती. त्या वेळी त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात शिशुपाल सिंह, शिवलाल आणि धर्मेंद्र कुमार सिंह हे सैनिक घटनास्थळीच मृत्यू पावले. ओडिशा सरकारने वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

संपादकीय भूमिका

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात न आणू शकणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !