जम्मू-काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ७ आतंकवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये १९ जून या दिवशी कुपवाडा आणि कुलगाम या जिल्ह्यांत झालेल्या चकमकींत ४ आतंकवाद्यांना, तर २० जूनच्या पहाटे कुपवाडा अन् पुलवामा या जिल्ह्यांत ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. गेल्या २४ घंट्यांत सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये एकूण ३ चकमकी झाल्या. मारण्यात आलेल्या आतंकवाद्यांपैकी एक पाकिस्तानी आणि लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचा सदस्य होता. सैन्याने नुकत्याच अटक केलेल्या शौकत अहमद शेख या आतंकवाद्याकडून माहिती मिळाल्यानंतर कुपवाडामध्ये शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.

वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत ११४ आतंकवाद्यांना करण्यात आले ठार !

सुरक्षादलांनी काश्मीर खोर्‍यात आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ऑलआउट’ चालू केले आहे. या वर्षात आतापर्यंत ३२ परदेशींसह ११४ आतंकवादी मारले गेले आहेत.

संपादकीय भूमिका

आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !