कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे हास्यास्पद विधान !
बेंगळुरू (कर्नाटक) – सैन्याच्या ‘अग्नीपथ’ योजनेमधून अडीज लाख तरुणांना सेवेत घेतले जाईल जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असतील. हे संघाचे छुपे धोरण आहे. ४ वर्षांच्या सेवेनंतर ज्या ७५ टक्के तरुणांना सैन्यातून निवृत्त करण्यात येईल, ते देशभरात पसरतील. जर तेही संघाचे स्वयंसेवक असतील, तर मग हा सैन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे, असा हास्यास्पद दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी केला. ‘कदाचित् त्यांना (संघाला) देशात नाझी राजवट आणायची आहे. यासाठी त्यांनी अग्नीपथ योजना आणली आहे’, असेही ते म्हणाले.
संपादकीय भूमिका
|