Houthi Israel : हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात इस्रायली नौकांवर डागली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

गेल्या महिन्यात हुती आतंकवाद्यांनी तुर्कीयेहून भारतात येत असलेल्या नौकेचे अपहरण केले होते.

Maldives : मालदीवमध्ये सैन्यतळ कायम ठेवण्यासाठी भारताकडून मालदीवशी केली जात आहे चर्चा !

भारत आणि मालदीव यांच्यामध्ये मालदीव येथे भारताचे सैन्यतळ कायम ठेवण्यावरून चर्चा चालू आहे. या संदर्भात दोन्ही देशांकडून एक संयुक्त समिती स्थापन करण्यावर संमती झाली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसवरील गोळीबारात ८ जणांचा मृत्यू, तर २६ जण घायाळ

ही बस गिलगिटहून रावळपिंडीकडे जात होती. गोळीबारामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस विरुद्ध बाजूने येणार्‍या ट्रकला धडकली.

Tripura Infiltration : त्रिपुरात वर्षभरात भारत-बांगलादेश सीमेवरून ७१६ घुसखोरांना अटक ! – सीमा सुरक्षा दल

यामध्ये ११२ रोहिंग्या मुसलमान आणि ३१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे.

देशाची एकता आणि अखंडता यांचे रक्षण करण्यास आमचे सैन्य सक्षम आहे ! – राष्ट्रपती

पुणे येथे ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा १४५ वा दीक्षांत समारंभ !

Defence Deal : केंद्र सरकारकडून २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला मान्यता !

केंद्रशासनाने भारतीय सैन्यदलाला आणखी बळकट करण्यासाठी २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला स्वीकृती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’ने हा निर्णय घेतला.

आमच्या मुलांना (सैनिकांना) परत बोलवा !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाला आता पावणे दोन वर्षे उलटली आहेत; परंतु अजूनही युद्ध थांबलेले नाही. सहस्रावधी रशियन सैनिक युक्रेनमध्ये लढत आहेत. अशातच त्यांच्या घरातील महिलांनी राजधानी मॉस्को येथे त्यांना परत बोलवण्याची मागणी करत आंदोलन केले.

पाकिस्तानच्या २ निवृत्त सैन्याधिकार्‍यांना देशद्रोहावरून कारावासाची शिक्षा

विदेशात रहात असल्याने शिक्षा भोगू शकणार नाहीत !

काश्मीरमधील आतंकवादी कारवायांमागे पाकिस्तानच्या निवृत्त सैनिकांचा हात ! – भारतीय सैन्याची माहिती

असे आहे, तर भारताने थेट पाकवर आक्रमण करून पाकचा निःपात करणे आवश्यक आहे अन्यथा असे निवृत्ती सैनिक येत रहाणार आणि आपण त्यांना मारत राहू ! यातून काश्मीरमधील आतंकवाद कधीच मुळासह नष्ट होऊ शकणार नाही !

काश्मीरमध्ये मेजर आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

सैन्याला प्राप्त झालेल्या माहितीनंतर सैन्याने येथे लपलेल्या २ आतंकवाद्यांना घेरले. त्या वेळी ही चकमक झाली. अन्य एक सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.