विदेशात रहात असल्याने शिक्षा भोगू शकणार नाहीत !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सैन्यातील २ निवृत्त अधिकार्यांना देशद्रोहाच्या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. मेजर आदिल फारूख रजा यांना १४, तर कॅप्टन रझा मेहदी यांना १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हे दोन्ही अधिकारी विदेशात रहात असल्याने ते शिक्षा भोगू शकणार नाहीत. याच वर्षी जून मासामध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांकडून सैन्याच्या तळावर आक्रमण करण्यात आले होते. या समर्थकांना वरील दोन्ही निवृत्त अधिकार्यांनी भडकावल्याचा आरोप होता.