आमच्या मुलांना (सैनिकांना) परत बोलवा !

रशियन सैनिकांच्या पत्नी, आई आणि बहिणी यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन

मॉस्को (रशिया) – रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाला आता पावणे दोन वर्षे उलटली आहेत; परंतु अजूनही युद्ध थांबलेले नाही. सहस्रावधी रशियन सैनिक युक्रेनमध्ये लढत आहेत. अशातच त्यांच्या घरातील महिलांनी राजधानी मॉस्को येथे त्यांना परत बोलवण्याची मागणी करत आंदोलन केले. या महिलांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

सौजन्य कणाल13 

या आंदोलनाचे अनेक व्हिडिहआ सामाजिक माध्यमांतून समोर आले असून त्यांमध्ये रशियन महिला म्हणत आहेत, ‘आम्हाला शांतता हवी आहे. १ वर्षापूर्वी युक्रेनमध्ये लढण्यासाठी गेलेल्या सैनिकांना आता मायदेशी आणले पाहिजे. आमच्या मुलांनी देशासाठी लढा दिला आहे. त्यांचे रक्त सांडले आहे. आता त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे परतावे, पण सरकार असे का करत आहे ? युक्रेनमधील काम पूर्ण झाल्यानंतर सैन्य परत आणले जाईल, असे आश्‍वासन रशियन सरकारने दिले होते.’

दुसरीकडे रशियन सरकारने सध्या युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यांची तिथे आवश्यकता आहे. युद्ध अजून संपलेले नाही, असे म्हटले आहे.