नवी देहली – काश्मीरमधील आतंकवादी कारवायांमागे पाकिस्तानच्या निवृत्त सैनिकांचा हात आहे, असे भारतीय सैन्याचे उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले.
सौजन्य हिंदुस्तान टाइम्स
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बाजीमल भागात आतंकवाद्यांशी नुकत्याच झालेल्या चकमकीत २ कॅप्टन आणि ३ सैनिक यांना वीरगती मिळाली. या चकमकीत सुरक्षादलांनी अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि पाकचा रहिवासी असलेला प्रमुख कमांडर क्वारी आणि अन्य १ आतंकवादी यांना ठार मारले.
याविषयी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा आक्रमण करणार्या आतंकवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला कळले की, त्यांच्यापैकी काही पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त सैनिक आहेत. स्थानिक तरुण आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक नसल्याने, तसेच पाकिस्तानमधील स्थानिक नागरिकांचा, विशेषत: तरुणांचा पाठिंबा नसल्यामुळे पाकिस्तान परदेशी आतंकवाद्यांना पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.
संपादकीय भूमिकाअसे आहे, तर भारताने थेट पाकवर आक्रमण करून पाकचा निःपात करणे आवश्यक आहे अन्यथा असे निवृत्ती सैनिक येत रहाणार आणि आपण त्यांना मारत राहू ! यातून काश्मीरमधील आतंकवाद कधीच मुळासह नष्ट होऊ शकणार नाही ! |