तेल अविव (इस्रायल) – येमेनच्या हुती आतंकवाद्यांनी ३ डिसेंबर या दिवशी लाल समुद्रातील ३ नौकांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी आक्रमण केले. यातील २ नौका इस्रायलची असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी अमेरिकेने म्हटले आहे की, लाल समुद्रात आमच्या युद्धनौकेवर आक्रमण करण्यासाठी डागण्यात आलेले ३ ड्रोन आम्ही पाडले आहेत. गेल्या महिन्यात हुती आतंकवाद्यांनी तुर्कीयेहून भारतात येत असलेल्या नौकेचे अपहरण केले होते.
इस्रायलच्या सैन्याची दक्षिण गाझाकडे कूच !
उत्तर गाझामध्ये सैनिकी कारवाई केल्यानंतर इस्रायली सैन्य आता दक्षिण गाझाकडे कूच करत आहे. यासाठी तेथील लोकांना अनेक क्षेत्रे रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. इस्रायलची देशांतर्गत गुप्तचर संस्था ‘रोनेन बार’ने म्हटले आहे की, ती लेबनॉन आणि तुर्कीयेपासून कतारपर्यंत हमासला शोधून मारील. त्यासाठी कितीही वर्षे लागली, तरी चालतील.
लेबनॉनमधून इस्रायली शहरांवर आक्रमणे वाढली आहेत. आता तेथून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. काही इस्रायली सैनिकही यांत घायाळ झाले आहेत.