Maldives : मालदीवमध्ये सैन्यतळ कायम ठेवण्यासाठी भारताकडून मालदीवशी केली जात आहे चर्चा !

डावीकडून महंमद मुईज्जू आणि नरेंद्र मोदी

माले (मालदीव) – भारत आणि मालदीव यांच्यामध्ये मालदीव येथे भारताचे सैन्यतळ कायम ठेवण्यावरून चर्चा चालू आहे. या संदर्भात दोन्ही देशांकडून एक संयुक्त समिती स्थापन करण्यावर संमती झाली आहे. यापूर्वी दुबई येथे ‘कॉप-२८’ शिखर परिषदेमध्ये मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुईज्जू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यात मालदीव येथे असलेले भारताचे ७५ सैनिक माघारी घेण्यावर सहमती झाल्याचे राष्ट्रपती मुईज्जू यांनी पत्रकारांना सांगितले होते.