जावळी तालुक्यातील करंदोशी येथील सैनिक कर्तव्य बजावतांना हुतात्मा !

जावळी तालुक्यातील करंदोशी गावच्या तेजस लहूराज मानकर या सैनिकाला पंजाब येथील भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावतांना डोक्यात गोळी लागली.

पाकिस्तानी ड्रोनद्वारे पाठवलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

पाकिस्तानमधून तस्करांनी बच्चीविंड गावामध्ये पाठवलेल्या ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पळवून लावले.

म्यानमारमध्ये सैन्याने लढाऊ विमानातून जमावावर केलेल्या बाँबफेकीमुळे १०० जणांचा मृत्यू

११ एप्रिल या दिवशी ही घटना घडली. जवळपास २० मिनिटे हे आक्रमण चालू होते. मरणार्‍यांमध्ये लहान मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.

भटिंडा (पंजाब) येथील सैनिकी छावणीतील गोळीबारात ४  सैनिकांचा मृत्यू

आतंकवादी आक्रमण नसून अंतर्गत वादातून घटना घडल्याचा दावा

हुतात्मा अजय ढगळे यांच्यावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार

सुभेदार अजय ढगळे हे देशसेवेत होते. २७ मार्च या दिवशी भारत-चीन सीमेवर तवांग परिसरात रस्त्याच्या कामाच्या ‘रेकी’साठी ढगळे गेले असतांना तेथे झालेल्या भूस्खलनात ते हुतात्मा झाले.

झारखंडमध्ये ५ नक्षलवादी ठार !

राज्यातील चतरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ५ नक्षलवाद्यांना ठार मारले. या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते.

अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार !

हे आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सिक्कीममध्ये भूस्खलनात सापडले ६ सैनिक  

भारतीय सेना दलाच्या सैनिकांना प्राणाची बाजी लावून अजय ढगळे आणि अन्य ५ सैनिकांना शोधून काढले. अजय ढगळे पार्थिव ३ एप्रिल या दिवशी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.

पाकिस्तानमध्ये सैन्य सत्ता हस्तगत करण्याची शक्यता !

पाकिस्तान सरकार अर्थसंकल्पामध्ये सैन्यावर करण्यात येणार्‍या खर्चात कपात करणार आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य अप्रसन्न आहे.