गोव्यातून आंध्रप्रदेशला नेण्यात येणारे मद्य बेळगाव येथे कह्यात

हे मद्य गोव्याच्या सीमेवरून विनातपास बेळगावला पोचले कि लाच घेऊन ते सोडण्यात आले ? हल्ली काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. सरकार याचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करणार का ?

गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील मद्यतस्करीचे मूळ काणकोण येथे !

काणकोण (गोवा) येथील लिगोरियो डिसोझा हा आंतरराज्य मद्यतस्करीमध्ये विदेशी मद्य पुरवणारा एकमेव पुरवठादार आहे. गुजरात न्यायालयाने लिगोरियो डिसोझा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

पाटण (जिल्हा सातारा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !

या कारवाईमध्ये २५ खोकी गोवा बनावटीचे मद्य, एक दुधाचे सहाचाकी वाहन, सकस दुधाची ५५३ कॅरेट आणि एक चारचाकी वाहन कह्यात घेण्यात आले आहे. तसेच ३ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

बनावट विदेशी मद्याचा साठा जप्‍त !

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या भरारी पथकाने कराड-चिपळूण मार्गावरील गोषटवाडी येथे कारवाई केली.

गोव्यातून ८ मासांत कोट्यवधी रुपये किमतीच्या मद्याची परराज्यात तस्करी !

अन्य राज्यांच्या तपासणीनाक्यांवर मद्याची तस्करी होत असल्याचे समोर येते, ते गोवा राज्यातील तपासणीनाक्यांवरच लक्षात कसे येत नाही ? पोलीस, प्रशासन आणि तस्करी करणारे यांच्यात साटेलोट तर नाही ना, अशी जनतेला शंका आल्यास नवल ते काय ?

पुणे येथे ‘क्‍लिनिक’मध्‍ये मद्य पाजून आधुनिक वैद्याचा तरुणीवर बलात्‍कार !

सामाजिक माध्‍यमावर झालेल्‍या ओळखीतून तरुणीला आधुनिक वैद्याने ‘क्‍लिनिक’मध्‍ये बोलवून तिला मद्य पाजून बलात्‍कार केल्‍याची घटना घडली आहे.

सिंधुदुर्ग : मद्याची अवैध वाहतूक, दोघांना अटक

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या घटना २-३ दिवसाआड होतच आहेत. अवैधरित्या वाहतूक होऊ नये, यासाठी पोलीस काही करतात कि नाही ?

तुर्भे (नवी मुंबई) येथे ६० लाखांच्या विदेशी बनावट मद्याचा साठा जप्त !

बनावट साठा बाळगणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

मुंबईत विदेशी मद्याचा १ कोटी रुपयांचा साठा जप्त !

गोवा राज्यातील मद्य छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या तिघांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंदवला.

नाशिक येथे महिला पोलिसांकडून अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त !

नाशिक महिला पोलिसांनी गावागावांतील अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, तर एकूण ३३ आरोपींविरुद्ध मुंबई मद्यबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ९४ सहस्र १७० रुपयांचे गावठी हातभट्टीचे मद्य, रसायन आणि इतर साहित्य साधने जप्त करण्यात आली आहेत.