चाहत्यांना वाईट सवयी लागू नयेत; म्हणून अल्लू अर्जुन करत नाही मद्य, तंबाखू आणि गुटखा यांचे विज्ञापन !
मुंबई – दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते अल्लू अर्जुन यांनी लोकप्रिय मद्य आणि पान मसाला यांच्या आस्थापनाचे विज्ञापन करण्यास नकार दिला. अल्लू अर्जुन यांनी नेहमीच तंबाखू, गुटखा आणि दारू यांची विज्ञापने करणे टाळले आहे. या वृत्तानुसार ‘पुष्पा २’ या आगामी चित्रपटामध्ये जेव्हा पुष्पराजचे पात्र दारू किंवा तंबाखूचे सेवन करील, तेव्हा तेव्हा या आस्थापनाचा लोगो तेथे सर्वांना दिसले, अशा रितीने दाखवण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी १० कोटी रुपये देण्यात येणार होते; मात्र अभिनेते अल्लू अर्जुन यांनी त्यास नकार दिला.
(सौजन्य : ABPLIVE)
अशाच एका उत्पादनाच्या विज्ञापनासाठी अल्लू अर्जुन यांनी नकार दिला होता. त्यांच्या समवेत काम करणार्यांनी सांगितले की, अल्लू अर्जुन तंबाखूचे सेवन करत नाही आणि ते त्यांच्या चाहत्यांनाही ही सवय लावू इच्छित नाही.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे विज्ञापन नाकारणारे किती अभिनेते, खेळाडू किंवा नामांकित लोक आज भारतात आहेत ? |