डोंबिवली – येथील मानपाडा भागातील ‘सेवन स्टार’ या बारमध्ये अजय सिंग हा मद्य पीत बसला होता. त्याच्या शेजारच्या टेबलावर बसलेला विकास भंडारी याच्याकडून त्याच्या खुर्चीला धक्का लागल्याने वाद झाला. त्या वेळी अजय याने रागवून जवळच्या पिस्तुलातील गोळी विकासवर झाडली. ती त्याच्या खांद्याला लागून गेली आणि तो घायाळ झाला. पोलिसांनी गुन्ह्यानंतर पसार झालेल्या अजय याला पकडले. रात्री सव्वाच्या सुमारास हा प्रकार घडला.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित डोंबिवली ! अमेरिकेप्रमाणेच आता भारतातही कधीही कुणीही चिडून गोळीबार करू लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे, असे यावरून म्हणावे का ? |