सोलापूर – येथील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ‘महिला ग्रामसभेचे’ आयोजन करण्यात आले होते. गावातील महिलांच्या अडचणी समजून घेण्याच्या उद्देशाने आयोजित या सभेत गावात मद्यबंदीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या वेळी ३०० हून अधिक महिला उपस्थित होत्या.
या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इंगळे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आशा सेविका भाग्यश्री स्वामी, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, तसेच सरपंच यशपाल वाडकर, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे इत्यादी उपस्थित होते.