पाकिस्तानमधील करतारपूर साहिब व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – शिखांसाठी पवित्र असलेल्या भारत-पाक सीमेजवळील करतारपूर साहिबच्या दुसर्या टप्प्याच्या विकासाचे काम चालू आहे. यांतर्गत नुकत्याच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मद्यपान आणि मांसाहार झाल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यामुळे करतारपूर साहिबच्या व्यवस्थापनार टीका होऊ लागली आहे. यावरून व्यवस्थापन समितीच्या अधिकार्यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या या व्हिडिओमध्ये चुकीची माहिती जोडण्यात आली आहे. आमचे नाव अपकीर्त करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. १८ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात अशा प्रकारे काहीच झाले नसल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.