चिमणगाव (जिल्हा सातारा) येथील रेशन दुकानामध्ये अवैधरित्या मद्यविक्री
कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे एका रेशन दुकानातच अवैधरित्या मद्यविक्री चालू होती. या ठिकाणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून संबंधिताना कह्यात घेतले असून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.