सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातील एकही डंपर येऊ देणार नाही ! – सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटना

गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी चेतावणी सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटनेने दिली आहे.

एल्.ई.डी. मासेमारी मर्यादित क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद करा ! – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

वेळागर येथे समुद्रात केल्या जाणार्‍या ‘पॅरासिलिंग’ या क्रीडा प्रकारामुळे मासेमारीकरता मासे उपलब्ध होत नाहीत.

शासकीय गाड्यांचा अपवापर करणार्‍यांवर कारवाई करा ! – सुरेश बापर्डेकर, तारकर्ली, मालवण

सरकारची गाडी आणि सरकारच्या पैशांची उधळपट्टी होऊनही सरकारी यंत्रणा गप्प का ?

पुढील काही वर्षे कोरोनाच्या संदर्भातील सर्व निर्बंध पाळावेच लागणार ! – तज्ञांचे मत

पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सामाजिक अंतर आणि तोंडावर मास्क घालून फिरावे लागेल, असे इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख असणार्‍या डॉ. मेरी रॅमसे यांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘गृहमंत्र्यांच्या त्यागपत्राचा प्रश्‍नच नाही !’ – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

ते पुढे म्हणाले, ‘‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे कुणालातरी खूष करण्यासाठी आहेत. त्या आरोपांनंतर विरोधक करत असलेल्या सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद आहे.

कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्याने कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

कोरेगाव शहरातील विविध व्यावसायिक, ग्राहक, तसेच प्रवासी यांनी ‘मास्क’ लावले नाही, म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हरिद्वार येथील विविध प्रभागांंमध्ये अस्वच्छतेसह डासांचा उपद्रव

हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्याच्या वेळीही हरिद्वारमध्ये अस्वच्छता असेल, तर अन्य वेळी किती अस्वच्छता असेल, याचा विचारच न केलेला बरा ! तेथे आरोग्य आणि स्वच्छता विभाग आहे कि नाही, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

हापूससदृश आंब्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांवर कारवाई करा ! – ग्राहक पंचायत, सिंधुदुर्ग शाखा

हापूस आंब्याच्या नावाखाली दुय्यम प्रतीचा हापूससदृश आंबा विकून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादक शेतकर्‍यांना लाभ होत नाहीच, तसेच ग्राहकांचीही फसवणूक होते.

हिमाचल प्रदेशातील शक्तीपीठ असलेल्या ज्वालामुखी मंदिरामध्ये मुसलमान अधिकार्‍यांची नियुक्ती ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

३० डिसेंबर २००७ पर्यंत राज्यात काँग्रेस सत्तेवर होती. तिने जर या शक्तीपीठात अहिंदूंची नियुक्ती केली असेल, तर हिंदूंनी आणि आताच्या भाजप सरकारने तिला जाब विचारणे आवश्यक !

कोरोनासंबंधी निर्बंधांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आणि आस्थापने यांच्यावर कठोर कारवाई करणार ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोना महामारीविषयी असलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याची चेतावणी शासनाने दिली आहे.