म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप !

म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप करण्यात आला.

विशाळगडावरील अतिक्रमणाचे सूत्र गंभीर असून याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत बैठक घेऊ ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

जिल्हाधिकार्‍यांना सूचित करून सर्वांची एकत्रित बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांना योग्य ती पावले उचलण्यासाठी सांगणार, असे आश्‍वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.

अनधिकृत टपर्‍या हटवा, अन्यथा ५०० टपर्‍या उभारण्यासाठी अनुमती द्या ! – शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

अतिक्रमणासमवेत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे चालू आहेत. यासाठी पालिकेची कोणतीही अनुमती घेतली जात नाही. बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच इतस्त: पडलेले असते. कामात हयगय करणार्‍या भागनिरीक्षकांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.

वाई (जिल्हा सातारा) येथील तहसीलदारांचे आदेश धुडकावणार्‍या तलाठ्यांवर कारवाई !

तहसीलदारांनी तलाठी कुंभार यांना वाळू चोरीच्या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार टाकलेल्या धाडीत चोरलेली वाळू आणि साहित्य कह्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.

तीनहून अधिक रुग्ण आढळल्यास ५० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार !

महापालिका, पोलीस, उत्पादन शुल्क यांसह विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १९ मार्चपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार

आयुर्वेद आणि वनौषधी यांचे महत्त्व जाणून त्यांची लागवड अन् संवर्धन यांसाठी प्रयत्न करणार्‍या जनशिक्षण संस्थानचे अभिनंदन !

६ नगरपालिकांमध्ये सरासरी ८४.६५ टक्के, तर पणजी महानगरपालिकेत ७०.३३ टक्के मतदान

मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत झाले. कोरोनाबाधित रुग्णांनी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले.

विशाळगडावरील अतिक्रमणाची गडावर जाऊन पहाणी करणार ! – कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला आश्‍वासन

विशाळगडावरील अतिक्रमण हटवून दोषींवर कारवाई करावी,यासाठी कोल्हापूर, सातारा, जळगाव, धुळे आणि यावल येथे दिले निवेदन

पुण्यात पीएमपी ५० टक्के प्रवाशांनाच अनुमती

बसमध्ये १७ ते २१ इतकेच प्रवासीच बसू शकतील. या सर्व डेपोच्या व्यवस्थापकांना बसमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि सॅनिटायझेशन यांविषयीच्या सूचना दिल्या आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री छापील किमतीवर करू नका ! – अन्न आणि औषध प्रशासनाची (एफ्.डी.ए.ची) किरकोळ औषध विक्रेत्यांना सूचना

वेगवेगळ्या आस्थापनांनी उत्पादित केलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन विविध किमतींना शहरात विकले जात असल्याचे निदर्शनात आले होते. सध्या कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन या इंजेक्शनची किंमत नियंत्रित करून ती दीड सहस्र रुपयांपर्यंत अल्प करण्याच्या हालचाली प्रशासनाने चालू केल्या आहेत