एक लाख रुपयांची लाच मागणार्‍या पुणे येथील महिला पोलीस अधिकारी निलंबित !

पुरुषांच्या बरोबरीने महिलाही लाच घेण्यात कचरत नाहीत, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.

नवी मुंबई येथे ३ लाखांची लाच मागणारी महिला तहसीलदार पोलिसांच्या कह्यात !

महिलाही भ्रष्टाचारात पुढे असणे हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

भिवंडी येथील लाचखोर बिट निरीक्षक कह्यात !

भिवंडी महानगरपालिकेच्‍या क्षेत्रातील प्रभाग समिती क्र. ३ येथील एका अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्‍यासाठी प्रत्‍येक सज्‍जानुसार ५० सहस्र रुपयांची मागणी बिट निरीक्षक रमाकांत म्‍हात्रे यांनी केली होती.

सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार निलंबित !

केवळ निलंबन नको, तर लाच स्वीकारणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

चतु:श्रृंगी (जिल्हा पुणे) पोलीस ठाण्यातील २ पोलिसांवर लाच घेतल्यामुळे गुन्हा नोंद !

पोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे, असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?

अधिकारी पदावर योग्य व्यक्तीच हवी !

महत्त्वाच्या पदावर भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणारी व्यक्ती अधिकारी म्हणून रहाणे घातक आहे. शिक्षण विभागात इतरांची गळचेपी होणार नाही, याची काळजी घेणारा अधिकारी त्या पदावर असायला हवा.

मुंबई महानगरपालिकेच्या लाचखोर कार्यकारी अभियंत्याला अटक !

मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली. अंधेरी (पूर्व) येथील एका खासगी आस्थापनातील पत्र्याची शेड तोडू नये, यासाठी त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे दक्षता जनजागृती सप्ताह

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित केला आहे. शासकीय काम करण्यासाठी लागणार्‍या शुल्काच्या व्यतिरिक्त कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी काम करण्यासाठी पैसे किंवा वस्तू यांची मागणी करत असेल, तर ती लाच आहे.

नाशिक येथे एका महिलेच्या मध्यस्थीने ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना मंडळ अधिकार्‍याला अटक !

येथील मंडळ कार्यालयात दिलेला अर्जाचा निकाल देण्यासाठी १ लाखांच्या लाचेची मागणी करत ५० सहस्रांची लाच एका महिलेच्या माध्यमातून स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

सावदा (जिल्हा जळगाव) येथील दोन लाचखोर पोलीस अधिकार्‍यांना अटक !

अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणारे सावदा (जिल्हा जळगाव) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले आणि उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ नोव्हेंबरला सकाळी अटक केली.