मुंबई महानगरपालिकेच्या लाचखोर कार्यकारी अभियंत्याला अटक !

५० लाखांच्या लाचेची मागणी

मुंबई – मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली. अंधेरी (पूर्व) येथील एका खासगी आस्थापनातील पत्र्याची शेड तोडू नये, यासाठी त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. पत्र्याची शेड अनधिकृत असल्याने पालिकेने नोटीस बजावली होती. शेड पहाण्यासाठी पालिकेचे पथक आले. तेव्हा तक्रारदाराने अभियंता पोवार यांना बोलावले. त्यांनी तक्रारदाराला कार्यालयात भेटायला बोलावून लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा रचून वरील कारवाई करण्यात आली.