वन विभागाचा ठाणे येथील लाचखोर वन परिमंडळ अधिकारी कह्यात !

येऊरच्‍या जंगलातील टेकडीवर मुरूम-माती वाहून नेण्‍यासाठी वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी विकास कदम यांनी तक्रारदाराकडे ६ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

नाशिक येथे भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षकांना ५० सहस्रांची लाच घेतांना अटक !

भूमी मोजणीमध्‍ये क्षेत्र कायम करण्‍यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच मागितली होती; मात्र तडजोडीअंती ५० सहस्र रुपये द्यायचे ठरले होते.

भिवंडी न्‍यायालयातील लाचखोर लिपिक कह्यात !

भिवंडी न्‍यायालयात लिपिक म्‍हणून कार्यरत असलेला सरफराज शेख याला तक्रारदाराकडे ४ प्रकरणांवर ‘नंबरींग’ करून पुढील कार्यवाही करण्‍याकरता २ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

दारू विक्रेत्‍याकडून ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरसेवकाला अटक !

परवानाधारक दारूच्‍या दुकानाच्‍या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्‍यासाठी ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरपंचायत नगरसेवक अनिल उत्तमराव गेडाम यवतमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

बार्शी येथे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोघांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले !

पांगरी पोलीस ठाण्यातील प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि चहा कॅन्टीन चालक या तिघांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

(म्‍हणे) ‘लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे नाव अन् छायाचित्र माध्‍यमांमध्‍ये देऊ नका !’ – अधिकारी महासंघाची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

अधिकारी महासंघाने अशी मागणी करून लाचखोरांची पाठराखण करण्‍यापेक्षा ‘प्रामाणिकपणे कामे करून स्‍वतःतील भ्रष्‍टाचारी वृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करावेत’ !

उल्‍हासनगर महापालिकेच्‍या २ लाचखोर मुकादमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक !

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

लाच मागितल्याच्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील मलंग तांबोळी याला अटक !

दारूबंदी कायद्यानुसार नोंद असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी सहकार्य करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील जवान मलंग तांबोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट !

वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली आहे. वर्ष २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५५ प्रसंगांत सापळे लावून १ सहस्र ६४ लाचखोरांना अटक केली होती; पण वर्ष २०२२ मध्ये सापळे आणि लाचखोर या दोन्हींची संख्या न्यून झाली आ

पिंपरी (पुणे) पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक डोळस यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

अशा लाचखोर पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे !