भिवंडी येथील लाचखोर बिट निरीक्षक कह्यात !

ठाणे, १० नोव्‍हेंबर (वार्ता.) – भिवंडी महानगरपालिकेच्‍या क्षेत्रातील प्रभाग समिती क्र. ३ येथील एका अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्‍यासाठी प्रत्‍येक सज्‍जानुसार ५० सहस्र रुपयांची मागणी बिट निरीक्षक रमाकांत म्‍हात्रे यांनी केली होती. तक्रारदाराने केलेल्‍या तक्रारीनंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रमाकांत म्‍हात्रे यांना कह्यात घेतलेले आहे. या प्रकरणी पुढील अन्‍वेषण चालू आहे. (अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्‍यांची सर्व संपत्ती जप्‍त करायला हवी. – संपादक)