पुणे – नातेवाईकांवर चोरीचा गुन्हा नोंद न करण्यासाठी २५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रशांत जाधव आणि पोलीस शिपाई अजित गायकवाड यांना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ नोव्हेंबर या दिवशी केली. लाच देणे हे तक्रारदारास मान्य नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती, त्यानुसार दोन्ही पोलिसांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे, असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? लाचखोरीवर जरब बसण्यासाठी एक सक्षम यंत्रणा प्रत्येक कार्यालयात उभारण्यासाठी आता सर्वसमावेशक प्रयत्न होणे आवश्यक आहे. |