वाडा (पालघर) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत् महामंडळाच्या उपकार्यकारी अभियंत्याला कह्यात !

वाडा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळाअंतर्गत केलेल्या विविध कामांचे देयक संमत करून पुढील कार्यालयात पाठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत् महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर रघुनाथ वट्टमवार यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण व्यवस्थापन विभागाचे लाचखोर उपकार्यकारी अभियंता कह्यात !

तडजोडीअंती ५० सहस्र रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेतल्याचे अन्वेषणातून उघड झाले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माने यांना कह्यात घेतले आहे.

दौंड (जिल्हा पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई आणि अधीक्षक यांना लाच घेतांना अटक !

दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्यासह शिपाई खोत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

अमरावती येथे लाच घेतांना नायब तहसीलदाराला अटक !

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील अचलपूर येथील तहसील कार्यालयात स्वतःच्या कक्षामध्येच १८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना नायब तहसीलदार शंकर श्रीराव यांना १७ ऑक्टोबर या दिवशी रंगेहात पकडून अटक केली.

नागपूर येथे महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञास लाच घेतांना अटक !

याविषयी त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता पावडे यांनी नवीन वीजमीटर लावून घेण्यास सांगितले आणि त्यासाठी कागदपत्रे अन् ७ सहस्र ५०० रुपयांची लाच मागितली होती.

विद्युत् निरीक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !

नाशिक येथे लाच मागणार्‍या जिल्हा रुग्णालयातील लिपिकास अटक !

सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण होण्यास भारतावर ६५ वर्षे राज्य करणारी आणि ‘भ्रष्टाचारास शिष्टाचार’ म्हणणारी काँग्रेसच उत्तरदायी आहे !

अमरावती महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या धर्मांध प्रभारी अधीक्षकांना लाचखोरीप्रकरणी अटक !

महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक सय्यद अन्वर सैय्यद अकबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

सिडकोचे लाचखोर अधीक्षक अभियंता आणि निवृत्त साहाय्यक कार्यकारी अभियंता यांना अटक !

अशा भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी सिडकोने करायला हवी !

भिवंडी येथील लाचखोर पोलीस नाईक कह्यात !

पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार !