सोलापूर – प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर या दिवशी २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना शिक्षणाधिकारी लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. ३ नोव्हेंबर या दिवशी लाचलुचपत विभागाकडून अहवाल प्राप्त होताच तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने अवर सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मुंबई, आयुक्त शिक्षण विभाग पुणे अन् संचालक शिक्षण विभाग पुणे या कार्यालयांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल पाठवला होता.
निलंबन आदेशानुसार किरण लोहार यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे आणि पुढील आदेश मिळेपर्यंत ते निलंबित रहातील. त्याचप्रमाणे निलंबन कालावधीत लोहार यांचे मुख्यालय सोलापूर हे ठेवण्यात आले असून त्यांना या कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही.
संपादकीय भूमिकाकेवळ निलंबन नको, तर लाच स्वीकारणार्या भ्रष्ट अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे ! |