एक लाख रुपयांची लाच मागणार्‍या पुणे येथील महिला पोलीस अधिकारी निलंबित !

पुणे – तक्रारदाराच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रविष्ट गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी, तसेच आई-वडील आणि बहीण यांना अटक न करण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी दगडे यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दगडे यांनी केलेले वर्तन दायित्वशून्य, पोलीस दलाची प्रतिमा खराब करणारे असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दगडे यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

संपादकीय भूमिका 

पुरुषांच्या बरोबरीने महिलाही लाच घेण्यात कचरत नाहीत, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.