‘मेट्रो’च्या कामांचे सुधारित वेळापत्रक करा – मुख्यमंत्री
मुंबई शहर आणि उपनगरांतील ‘मेट्रो’ प्रकल्पांचा आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून चालू असणार्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांनी ‘मेट्रो’ची कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक करण्याचे निर्देश दिले.