साधकांना तात्त्विक विषयासमवेत प्रायोगिक स्तरावर मार्गदर्शन करून साधनेस कृतीप्रवण करणारी अन् मोक्षपथावर नेणारी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्थापन केलेली एकमेवाद्वितीय अशी ‘सनातन संस्था’ !

‘अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व असून तात्त्विक भागाला केवळ २ टक्केच महत्त्व आहे. ‘सनातन संस्था’ ही एकमेव अशी संस्था आहे, जी ‘अध्यात्म, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्म’ अशा सर्व विषयांवर केवळ तात्त्विक स्तरावर न सांगता ‘यांतील सूत्रे कृतीत कशी आणायची ?’, याविषयी अचूक मार्गदर्शन करते. विविध माध्यमांतून आणि विविध प्रकारे संस्था साधकांसह जिज्ञासू अन् धर्मप्रेमी व्यक्तींना … Read more

साधकांनी सेवा करतांना प्रति  १-२ घंट्यांनी (तासांनी) व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक ! 

साधकांनी शक्यतो प्रति १ – २ घंट्यांनी चालू असलेली सेवा किंवा वैयक्तिक कामे थांबवून पुढील प्रयत्न क्रमाने करावेत. २ – ३ मिनिटे आवरण काढणे, प्रार्थना करणे, अर्ध्या मिनिटासाठी एखादा भावप्रयोग करणे, एखादी स्वयंसूचना देणे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी शोधून काढलेले ‘प्राणशक्तीवहन पद्धतीचे अद्भुत उपाय’, ही आपत्काळातील संजीवनी !

प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘आता केवळ षड्चक्रांवरच उपाय करून चालणार नाहीत, तर व्यक्तीच्या शरिरातील सर्व स्थानांवर (डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कुठेही) असलेला शक्तीच्या प्रवाहातील अडथळा शोधून त्यावर उपाय करावे लागतील.

विविध दृकश्राव्य माहितीपटांचे (‘व्हिडिओ’ आणि ‘ऑडिओ’ यांचे) निवेदन करण्यासाठी स्त्री आणि पुरुष (साधक) निवेदकांची आवश्यकता !  

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात विविध दृकश्राव्य माहितीपट तयार केले जातात. या माहितीपटांचे निवेदन करण्यासाठी स्त्री आणि पुरुष निवेदकांची आवश्यकता आहे. जे साधक पूर्णवेळ आश्रमात राहून किंवा मधेमधे सुटी घेऊन आश्रमात येऊन निवेदन करण्याची सेवा करू शकतात, त्यांनी त्यांची नावे पुढील पत्त्यावर कळवावीत.

संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जीवित ! – मुख्यमंत्री

भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जीवित राहिली आहे. पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संतांच्या विचारांनी हटवल्यामुळे आपल्या संस्कृतीला कुणीही संपवू शकले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पिंगुळी येथील सुप्रसिद्ध प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात चोरी

तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर आणि प.पू. समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज समाधी मंदिर या २ मंदिरांत ३ जानेवारीच्या मध्यरात्री चांदीच्या मूर्ती आणि दानपेटीतील रोख रक्कम, अशी एकूण ५ लाख ३८ सहस्र रुपयांच्या साहित्याची चोरी झाली आहे.

धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी मडगाव येथील दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात हिंदूंमध्ये संताप

गोव्यातील मंदिरे आणि मठ यांना ‘लुटारू’ असे संबोधून समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून सामाजिक कलह निर्माण करणारे मडगाव येथील उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार श्री. जयेश थळी यांनी केली आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : माजी सरपंचावर प्राणघातक आक्रमण !, अंध मुलावर अत्याचार करणारे दोघे अटकेत !…

भूमीसंदर्भातील जुन्या वादातून तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

तात्पुरत्या उपाययोजना नकोत, तर दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करा ! – शेतकर्‍यांची मागणी

अशी मागणी आणखी किती वर्षे करावी लागणार ?