सर्व साधकांसाठी सप्तर्षींचा संदेश !

प्रतिदिन सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोरात घासावे, जेणेकरून दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये उष्णता निर्माण होईल. त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहून श्रीविष्णूचे स्मरण करून ११ वेळा ‘हरि ॐ निसर्गदेवो भव वेदम् प्रमाणम्’ हा मंत्र म्हणावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात निपाणी (कर्नाटक) येथील श्री. अशोक केरबा हावळ (वय ६२ वर्षे) यांनी मोकळे केलेले स्वतःचे मन !

आम्हा हावळ कुटुंबियांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी वडिलांचे परात्पर गुरुदेवांशी जे बोलणे झाले, त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

नम्रता आणि अल्प अहं हे गुण असणारे अन् वयाने लहान असूनही ज्योतिषशास्त्रात प्राविण्य मिळवून संशोधनाची सेवा करणारे श्री. राज कर्वे (वय २६ वर्षे) !

‘श्री. राज कर्वे यांच्याशी माझा गेल्या २ वर्षांपासून जवळचा संबंध आहे. गेल्या वर्षभरापासून मी श्री. राज कर्वे यांच्या समवेत ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला लक्षात आलेली श्री. राज कर्वे यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

गुरुकृपेचे अद्वितीयत्व

‘गुरुभक्तीयोगात येते की, सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण याहूनही अत्यंत कठीण गोष्ट आहे ‘गुरुकृपेविना ईश्वरी कृपा प्राप्त करणे.’

गुरुदेवांवर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे कठीण प्रसंगातही स्थिर रहाणार्‍या कतरास, झारखंड येथील सनातन संस्थेच्या ८३ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (वय ८१ वर्षे) !

सुसंवादातून उलगडलेला पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील महाप्रसादातील चैतन्याची साधिकेला आलेली प्रचीती !

मी तीनच घास घेतल्यावर माझे मन लगेच स्थिर झाले. माझ्या मनात सकारात्मक विचार येऊ लागले. ‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात साक्षात् श्री अन्नपूर्णामातेचे अस्तित्व आहे’, असे या प्रसंगावरून मला अनुभवता आले.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील कु. मोनिका आर्. (वय १८ वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे

‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला रामनाथी, गोवा येथे येण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. ‘मी गुरुदेव असलेल्या ठिकाणी जात आहे. गुरुदेवांशी बोलणार आहे’, असे मला वाटत होते. आश्रमात संतांना पहाण्याचे भाग्य मला लाभले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती अपार कृतज्ञताभाव असलेले ठाणे येथील श्री. ओंकार अशोक नातू !

‘माझ्या लहानपणापासून आतापर्यंतच्या आयुष्याची कमान सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्यांच्या हातात घेतली आहे. मी आतापर्यंत शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सेवेत उपयोग होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च, तर इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्या वतीने इयत्ता दहावी अन् बारावी यांची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे.

मुंबई आणि जुहू विमानतळ ३ दिवस १ घंटा बंद !

भारतीय हवाई दलाच्या वतीने मरिन ड्राईव्ह येथे १२ ते १४ जानेवारी या कालावधीत हवाई प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे.