महाजनांच्या वादाचे प्रकरण
सांखळी (गोवा) : हरवळे येथील श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानात महाजनांमध्ये मानपानावरून वाद झाला होता. यातून निर्माण झालेल्या तणावामुळे ८ मार्चला मध्यरात्री प्रशासनाने मंदिर बंद केले, तसेच ९ मार्चला होणारे पारंपरिक दिवजोत्सव (दिव्यांचा उत्सव) आणि रथोत्सव रहित करण्यात आले आहेत.
१. महाशिवरात्रीला (८ मार्चला) अभिषेक आणि आरती या वेळी मानपानावरून देवस्थान समिती अन् वरचे हरवळे येथील महाजन यांच्यात वाद झाला. परिस्थिती पाहून पोलिसांनी दुपारी सर्वांना मंदिरातून बाहेर काढले. रात्रीपर्यंत वाद न मिटल्याने प्रशासनाने मंदिराला टाळे ठोकले.
२. ९ मार्चला श्री कुडणेश्वर देवस्थानचे महाजन मळीक गावकर दिवजोत्सवाच्या विधीचा मान स्वीकारण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. देवस्थानचे विधी रहित केल्याने मळीक गावकर यांनी प्रशासनाच्या कृतीवर आक्षेप घेतला. त्याच वेळी हरवळेचे गावकारही श्री सातेरी केळबाईचा कलश घेऊन तेथे पोचले होते; मात्र पोलिसांनी त्यांनाही मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यामुळे परंपरेने होणारा दिवजोत्सव आणि रथोत्सव झाला नाही.
हे वाचा – गोवा : मानपानावरून हरवळे येथील श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानात उफाळला वाद
संपादकीय भूमिका
|