‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) १२ जानेवारीला नव्या मालिकेतील ‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी  ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली.

ED Raids TMC Leaders : बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’च्या धाडी !

‘ईडी’च्या या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालचे मंत्री शशी पंजा म्हणाले की, ही कारवाई राजकीय सूडभावनेतून करण्यात आली आहे.

VIDEO : कोलकाता येथील प्रसिद्ध हिंदु नेत्याने केलेल्या कारसेवेचे अद्वितीय अनुभव !

कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन पदाधिकारी आणि ʻभारतीय साधक समाजʼ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिर्बान नियोगी यांनी केलेल्या कारसेवेतील अद्वितीय अनुभव या व्हिडिओतून जाणून घेऊया.

 बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सादिक खान यांच्याकडून मंचावरच हनुमान चालिसाचे पठण !

काही जण, म्हणजे धर्मांध मुसलमानच धर्माच्या नावावार उन्माद पसरवण्याचा प्रयत्न गेली अनेक दशके करत आहेत. त्याविषयी खान का बोलत नाहीत ?

श्रीराम हे आमचे आराध्यदैवत असून आम्ही त्यांचे वंशज आहोत ! – काँग्रेसचे नेते इम्रान मसूद

श्रीराम हे आमचे आराध्यदैवत असून आम्ही त्यांचे वंशज आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इम्रान मसूद यांनी मेरठमधील काँग्रेसच्या संवाद आणि कार्यशाळा या कार्यक्रमात केले.

आज पंतप्रधानांच्या हस्ते ‘अटल सेतू’चे लोकार्पण !

मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी वा नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन घंटे द्यावे लागतात; मात्र हा प्रवास या सेतूमुळे केवळ २० ते २२ मिनिटांत होईल.

नाशिक येथे रामकुंडावर गोदावरीची महाआरती करून पंतप्रधान घेणार काळाराम मंदिराचे दर्शन !

मोदी यांचे नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते संभाजीनगर रस्त्यावर नीलगिरी बाग येथील मैदानावर हेलिकॉप्टरने उतरणार आहेत. त्यानंतर उपाहारगृह मिर्ची ते संत जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत त्यांचा ‘रोड शो’ असेल.

महाराष्ट्रात २२ जानेवारी या दिवशी शासकीय सुटी घोषित करा ! – प्रवीण पोटे, आमदार, भाजप

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने २२ जानेवारी या दिवशी उत्तरप्रदेश आणि गोवा येथे शासकीय सुटी घोषित करण्यात आली आहे.

‘ससून रुग्णालया’तील वाहनतळाची निविदा रहित !

‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील वाहनतळाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने समयमर्यादेत आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे ही नवीन निविदा प्रक्रिया रहित करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण चालू असतांना लोकांनी साहित्य पळवले !

लाभार्थ्यांऐवजी गर्दी केलेल्या लोकांनीच या पेट्या पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.