सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील डॉ. साजिद अहमद यांनी रमझानपूर्वी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. ते आता सतबीर सिंह राणा झाले आहेत. त्यांनी ४ वर्षांपूर्वी अनिता नावाच्या हिंदु तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी दोघांनी आपापल्या धर्माचे पालन करण्याविषयी निश्चित केले होते. पुढे पत्नीने त्यांना हिंदु धर्माचा अवलंब करण्याचा सल्ला दिला होता. डॉ. साजिद यांनी सांगितले, ‘मला लहानपणापासून हिंदु धर्माची आवड होती; पण कौटुंबिक बांधीलकी आणि इतर दायित्व यांमुळे मी कधीच हिंदु धर्म स्वीकारण्याचे धारिष्ट्य करू शकलो नाही. आता सतबीर सिंह राणा बनल्याचा आनंद आहे.’
१. डॉ. साजिद अहमद यांनी ११ मार्च या दिवशी सहारनपूर येथील हाऊसिंग डेव्हलपमेंटमध्ये असलेल्या हरि मंदिरात पत्नी आणि मुलगा यांच्यासह हिंदु धर्म स्वीकारला.
२. बजरंग दलाच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला. सतबीर सिंह राणा म्हणाले, ‘‘माझे पूर्वज एकेकाळी हिंदु होते; परंतु काही कारणांमुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता; मात्र आता हिंदु धर्मात प्रवेश केल्याने मला पुष्कळ आनंद झाला आहे. मी स्वेच्छेने हिंदु धर्म स्वीकारला आहे.’’
३. राणा पुढे म्हणाले की, मुसलमान समाजातील लोकांना त्यांचा निर्णय आवडलेला नाही. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे. त्यासाठी त्यांनी सुरक्षेसाठी पोलिसांकडे अर्जही केला आहे.