मुंबईत घरफोडी करणार्‍या टोळीचा प्रमुख असलेल्या बांगलादेशी घुसखोरासह ६ धर्मांधांना अटक !

टोळीचे विविध राज्यांतील ५३ गुन्हे उघडकीस !

मुंबई – बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात घरफोड्यांची टोळी सिद्ध करणार्‍या शाकीर उपाख्य गुड्डू शेख या टोळीप्रमुखासह ६ जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून अटक केली. कुर्बान आलममंडल, जाकीर फकीर, मानिक शेख, शुमोन शेख, सलमान शेख आणि अरबाज मन्सुरी, अशी त्यांची नावे आहेत. यामुळे घरफोडी आणि चोरी यांचे विविध राज्यांतील ५३ गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध चालू आहे.

१. शाकीर शेख पोलिसांच्या हाती येत नव्हता. तो जालना येथे असल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथील घरावर धाड घातली. यात वरील सर्व जण सापडले.

२. या सर्वांकडून गाडी, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, चॉपर, कोयता यांसह घरफोडीसाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले.

३. शाकीर हा आंतरराज्यीय टोळी चालवत असून देशभरात या टोळीने पुष्पळ गुन्हे केले आहेत. या टोळीविरुद्ध घरफोडीचे मुंबईतील १८ गुन्हे, भुसावळ आणि जालना जिल्ह्यात ३, तर तेलंगाणा अन् निजामाबाद येथे १३, भाग्यनगर येथे ७, गुजरात-अहमदाबाद येथे ४, पश्‍चिम बंगाल, हावडा आणि वर्धमान येथे ७, असे एकूण ५३ गुन्हे नोंद आहेत.

४. शाकीर प्रत्येक वेळी चोरीसाठी नवीन सीमकार्ड आणि भ्रमणभाष यांचा वापर करत होता. चोरी केल्यानंतर शाकीर लगेच पश्‍चिम बंगालमार्गे बांगलादेशमध्ये पळून जायचा.

संपादकीय भूमिका 

  • घुसखोर घुसखोरी करून गुन्हेगारी कृत्ये करतात आणि ते पोलिसांना गुंगारा देऊन पळूनही जातात, हे पोलिसांना अत्यंत लज्जास्पद ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
  • बांगलादेशातून होणार्‍या घुसखोरीवर भारत सरकार कधी नियंत्रण आणणार ?