नवी मुंबईत ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद !

सर्वच बांगलादेशी मुसलमान

नवी मुंबई – नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर रहाणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ५ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे. पायल कुटुस मलीक, रूबी काशम अली बेगम, कनिका बाबू शेख, राणी शब्बीर मुल्ला, हलीमा सलीम शेख, मोनिरूल सिद्धीकी शेख, सलीम कुका शेख, मासुद राजू राना अशी त्यांची नावे असून सर्वच बांगलादेशचे नागरिक आहेत. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे.

येथील एका सदनिकेत काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर रहात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे धाडी घातल्यावर वरील सर्व जण आढळून आले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाविषयी कोणताही पुरावा किंवा कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना कह्यात घेण्यात आले. या व्यतिरिक्त अजून एक बांगलादेशी नासरीन सिद्धीकी अक्तर नावाची महिला याच लोकांसमवेत आढळून आली होती; मात्र तिच्याकडे पारपत्र आणि वैद्यकीय उपचारार्थ देण्यात आलेला वैध व्हिसा आढळून आला. त्यामुळे तिला सोडून देण्यात आले.

संपादकीय भूमिका 

  • बेकादेशीररित्या रहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट असणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?
  • अशांना ‘घुसखोर’ घोषित करून त्यांना भारतातून हाकलून देणे आवश्यक आहे !