पोरबंदर (गुजरात) किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त !

समुद्री किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक असून त्यांची तस्करी करणार्‍या इराणी नौकेतील ५ विदेशी व्यापार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे.

कोपरगाव (अहिल्यानगर) येथील महाविद्यालयात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावले !

एरव्ही भगवद्गीता, योगासने शिकवण्याचा कुणा शाळेने निर्णय घेतला, तर पुरो(अधो)गामी जमात ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची आरोळी ठोकतात. आता मात्र यांपैकी कुणीही चकार शब्द काढत नाही, हे जाणा !

कुरकुंभ येथील अमली पदार्थ देहलीहून नंतर लंडनला पाठवले !

विमानाने ‘फूड डिलिव्हरी सर्व्हिस’च्या माध्यमातून अमली पदार्थ पाठवण्याची घटना उघडकीस आलेली आहे . या ड्रग्जची किंमत साधारण २८० कोटी रुपये असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथे भारतीय चलनातील ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

चीनमधून ऑनलाईन माध्यमाद्वारे कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापण्यात आल्या असून पोलिसांनी यातील प्रमुख ६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राची पायाभरणी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थुथुकुडी येथे १७ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी कुलशेखरपट्टणम् येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रोच्या) नवीन प्रक्षेपण केंद्राची पायाभरणीही केली.

Shabrimala Only Brahmin Priest : शबरीमाला मंदिरात केवळ मल्ल्याळी ब्राह्मणच पुजारी असू शकतात ! – केरळ उच्च न्यायालय

हिंदूंच्या प्रथा-परंपरा राज्यघटनाविरोधी असल्याचे सिद्ध करण्यासाठी साम्यवाद्यांकडून कुटील डाव खेळला जात आहे. अशांना केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चपराक बसली आहे, हेही तितकेच खरे !

Rajgad Water Pollution : पुणे जिल्ह्यातील राजगडावरील पिण्याचे पाणी प्रदूषित !

झोपी गेलेला पुरातत्व विभाग ! महाराष्ट्रातील गड-दुर्गांची दुःस्थिती होण्यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग विसर्जित करा !

Nepali Youths In Russian Army : रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी तरुणांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – नेपाळचे परराष्ट्रमंत्री

‘रशियातील सर्व नेपाळी तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्‍वासन सौद यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना केले.

Sandeshkhali Row : संदेशखाली प्रकरणी भाजपला धरणे आंदोलन करण्याची कोलकाता उच्च न्यायालयाकडून अनुमती !

आता आंदोलनापेक्षा बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! त्यामुळे भाजपने हिंदुहित रक्षणासाठी लवकरात लवकर ही कार्यवाही केली पाहिजे !

UK MP Targeted India : (म्हणे) ‘भारतीय हस्तक शिखांना लक्ष्य करत आहेत !’ – महिला शीख खासदार प्रीत कौर गिल, ब्रिटन

भारतावर आरोप करणारे गिल यांच्यासारखी मंडळी खलिस्तानी करत असलेल्या भारतविरोधी कृत्यांविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !