२६ नोव्हेंबरला आळंदी येथे १८ वे वारकरी अधिवेशन !

‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर १०० टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रायणी नदीत …

सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत पू. सांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे) !

पुत्तुर येथील साधकांना काही अडचण आली, तर ते मामांचे मार्गदर्शन घेतात. मामा त्यांना भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करतात. श्री. सांतप्पामामा म्हणजे पुत्तुर येथील साधकांचा आधारस्तंभच आहेत. ‘साधकांना साहाय्य करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत. 

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्‍या सनातनच्या १३० व्या संत उजिरे, कर्नाटक येथील पू. (श्रीमती) कमलम्मा (वय ८१ वर्षे) !  

कमलम्मा यांच्या मनात ‘साधनेमुळे स्वतःला जसा लाभ झाला आहे, तसा लाभ सर्वांना व्हायला पाहिजे’, अशी तळमळ आहे. त्यामुळे भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्या साधना करायला सांगतात. आतापर्यंत त्यांनी ‘वर्गणीदार बनवणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष लावणे आणि प्रसारसेवा करणे’, अशा सेवा केल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.) शशिकला किणी (वय ७७ वर्षे) !

अक्कांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव आहे. दिवसभरातील प्रत्येक कृती झाल्यावर त्या प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. यातून ‘मला पुष्कळ आनंद मिळतो’, असे त्या सांगतात. ‘गुरुदेवांनी माझा हात पकडून मला येथपर्यंत आणले’, या विचाराने प.पू. गुरुदेवांप्रती त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येतो.

पंडित सतीश शर्मा आणि स्वामी स्वात्मानंदजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

अमेरिकेत हिंदु धर्मप्रसाराचे कार्य करणारे स्वामी स्वात्मानंदजी, ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’चे अध्यक्ष असणारे इंग्लंड येथील पंडित सतीश शर्मा, तसेच त्यांच्यासमवेत कार्य करणार्‍या नविता यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी सनातनच्या फोंडा, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

साधनेचे तेज आणि असामान्य कर्तृत्व हेच दैवी सौंदर्य असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

पूर्वी एकदा मी चित्रीकरणाशी संबंधित सेवेत असतांना तिथे परात्पर गुरु डॉक्टर आले. तेव्हा आम्हा दोघांमधे पुढील संभाषण झाले…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती ! 

‘मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी अनुसंधान साधत असतांना घरातील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील गुरुदेवांचा चेहरा पूर्ण पिवळा झालेला असतो. ‘त्यातून माझ्याकडे चैतन्याची पिवळ्या रंगाची वलये येत आहेत’, असे मला जाणवते. त्यामुळे मला आनंद जाणवतो.

विवाहसोहळा नव्हे, श्री गुरूंनी अनुभवण्यास दिलेला भावसोहळाच !

श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे. या लेखाचा काही भाग आपण २४ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे वेळवंड (भोर, जिल्हा पुणे) येथील कै. रावजी पांगुळ (वय ७७ वर्षे) यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने जाणवलेली सूत्रे !

कै. रावजी अर्जुना पांगुळ यांचे ७.१२.२०२३ या दिवशी वयाच्या ७७ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. २५.११.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे त्यांचे पुतणे श्री. रामचंद्र दगडू पांगुळ आणि सून सौ. आनंदी पांगुळ यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

Arshad Madani on Waqf : (म्हणे) ‘मोदी उद्या ‘नमाज आणि जकात ही मुसलमानांची परंपरा नाही’, असे म्हणत तेही बंद करतील !’ – उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांची टीका

पंतप्रधान मोदी यांनी राज्यघटनेत जे लिहिले आहे, ते सांगितले. आतापर्यंत मुसलमान आणि ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष राज्यघटनेच्या नावाखाली हिंदूंना झोडपायचे आणि मुसलमानांना कुरवाळायचे काम करत आले होते. त्यांना या विधानामुळे मिरच्या झोंबल्याने ते अशी विधाने करू लागले आहे, हे लक्षात येते !