१. ‘मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी अनुसंधान साधत असतांना घरातील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील गुरुदेवांचा चेहरा पूर्ण पिवळा झालेला असतो. ‘त्यातून माझ्याकडे चैतन्याची पिवळ्या रंगाची वलये येत आहेत’, असे मला जाणवते. त्यामुळे मला आनंद जाणवतो.
२. गुरुदेवांच्या चेहर्यावरील हास्यात मला सजीवपणा जाणवतो.
३. गुरुदेव मला ‘साधनेच्या दृष्टीने प्रत्येक कृती कशी असायला हवी ?’, याची जाणीव करून देतात. मी त्याप्रमाणे कृती आणि विचार करते. त्यामुळे माझ्या मनातील सर्व चिंता, प्रश्न आणि अडचणी दूर होतात अन् माझा नामजप चालू होतो.’
– सौ. प्रज्ञा चेतन परब, फोंडा, गोवा. (११.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |