‘इ.व्ही.एम्.’ विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार ! – डॉ. हुलगेश चलवादी, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार

५० सहस्रांहून अधिकची हक्काची मते असूनही तेवढीही मते न मिळाल्याने इ.व्ही.एम्. यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आणि प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी केला.

विधानसभा निवडणूक निकालाला माजी सरन्यायाधीश डी. वाय. धनंजय चंद्रचूड उत्तरदायी !

विधानसभा निवडणूक निकालाच्या संदर्भात जे काही घडले, त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. धनंजय चंद्रचूड उत्तरदायी आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सत्ता स्थापनेनंतर मशिदीवरील अनधिकृत भोंगे, मदरसे सहन करणार नाही ! – आमदार नितेश राणे, भाजप

महाराष्ट्रातील हिंदु समाजाने ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, मशिदींवरील अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत मदरसे यांविरोधात मतदान केले आहे. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यावर या अनधिकृत गोष्टी आम्ही सहन करणार नाही.

प.पू. भक्तराज महाराज यांच्‍या महानिर्वाणदिनाच्‍या निमित्ताने कांदळी (जिल्‍हा पुणे) येथील आश्रमातील समाधीस अभिषेक !

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाणदिनी म्हणजेच २४ नोव्‍हेंबर या दिवशी सकाळी ९ ते ११ या कालावधीमध्‍ये प.पू. भक्तराज महाराज यांच्‍या समाधीस अभिषेक घालून नंतर पूजा करण्यात आली.