
कोल्हापूर – प्रतिवर्षीप्रमाणे स्वामीभक्त, स्वामी सेवक यांच्या वतीने २१ जानेवारीला पंचगंगेच्या काठावर सायंकाळी ६ वाजता ‘श्री स्वामी समर्थ’ या नामजपाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे या सोहळ्याचे ७ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी ७ सहस्रांहून अधिक स्वामीभक्त त्यात सहभागी होतात, अशी माहिती स्वामीसेवक समितीचे अरुण गवळी, गुरुदेव स्वामी, धनंजय महिंद्रकर, अमित पाटील, अभिजित पाटील, बाळासाहेब राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. अभिजित पाटील म्हणाले, ‘‘या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण सहभागी होतात. या सोहळ्यात कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारले जात नाही आणि तो सर्वांसाठी खुला असतो. तरी या सोहळ्यात उपस्थित रहाण्यासाठी भाविकांनी ५.३० वाजता पंचगंगा घाटावर उपस्थित रहावे.’’
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर