६ वर्षांच्या मुलीवर १२ वर्षीय मुलाकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न !

कारवाईसाठी सिंधी समाजाचा गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा !

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) – करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवर ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या प्रयत्न करणार्‍या १२ वर्षांच्या मुलाला मुलीच्या कुटुंबियांनी पकडले. त्याला चोप देऊन कुटुंबियांनी त्याला गांधीनगर पोलिसांच्या कह्यात दिले. या मुलावरील कारवाईस विलंब होत असल्याने पोलीस ठाण्यासमोर सिंधी समाजातील नागरिकांनी ठिय्या मांडून घोषणा दिल्या. त्याच कालावधीत अल्पवयीन मुलाची वैद्यकीय पडताळणी करून त्याला परत आणतांना सिंधी समाजाने मारहाण केली. यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला.

त्या काळात गांधीनगर व्यापारी संघटनांनी आवाहन केल्याने गांधीनगर परिसरातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद होती. यामुळे गांधीनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि दंगल प्रतिबंधक पथक बोलावण्यात आले होते. मुलावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत सिंधी समाजातील लोक पोलीस ठाण्यासमोर थांबून होते. रात्री विलंबाने मुलावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

धर्माचरणाच्या अभावी समाजाची नैतिकता संपत चालल्याने अशा घटना घडत आहेत आणि धर्माधिष्ठित शिक्षणप्रणालीचा समावेश करणे, हेच यावरील उत्तर आहे !