अलिबाग येथे विश्व हिंदु परिषदेकडून ‘वाल्मिकी रामायण’ ग्रंथावर आधारित कथामालेचे आयोजन !

अलिबाग – ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होणार आहे. याच पावन कालावधीमध्ये २४ ते २८ जानेवारी या दिवसात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्रीराम मंदिर, ब्राह्मण आळी, अलिबाग येथे श्री वाल्मिकी रामायणाच्या कथामालांचे आयोजन करण्यात आले आहे. या कथामाला अधिवक्ता श्रीराम ठोसर यांच्या वाणीतून ऐकायला मिळणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आव्हान समाज माध्यमातून भाजपचे शहर अध्यक्ष अधिवक्ता श्री. अंकित बंगेरा यांनी केले.

कार्यक्रमाचा उल्लेख करतांना सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे समाज माध्यमातून म्हणाले, ‘‘बाबराचा सेनापती मिरबाकी याने रामललाचे मंदिर उद्ध्वस्त केले आणि हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला आरंभ झाला. गेल्या अनेक वर्षांत कित्येक पिढ्यांनी संघर्ष केला आहे. त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाला गती प्राप्त झाली. प्रदीर्घ न्यायालयीन रक्तरंजित संघर्षानंतर या लढ्याला यश प्राप्त झाले. ‘श्री वाल्मिकी रामायण कथामालेचा लाभ घ्यावा’, असे आव्हान त्यांनी केले आहे.