Pune Chicken Mutton Shops : पुणे येथे २२ जानेवारीला मटण आणि चिकन विक्री बंद !

महाराष्ट्र हिंदु खाटिक मटण व्यावसायिक महासंघाचा अभिनंदनीय निर्णय !

पुणे – येथे २२ जानेवारीला प्रभु श्रीरामललाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदु खाटिक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद ठेवून मिठाई वाटप करून उत्सवात सहभागी होणार आहेत, असे माराष्ट्र हिंदु खाटिक मटण व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी घोषित केले आहे.

पारगाव सा.मा. दौंड तालुका, खेड तालुक्यातील मोई येथे तसेच पुरंदर तालुक्यातील दिवे येथे आणि अन्य ठिकाणीही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून असा आदेश काढण्यात आला आहे.