मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन !

नवी मुंबई – अयोध्या येथे श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ ओळखल्या जाणार्‍या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध बाजारपेठांमध्ये व्यापारी संघटनांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१. भाजीपाला बाजारपेठेत २१ जानेवारीला सकाळी ८ वाजता रामायणकथा प्रारंभ, दुपारी १२ वाजता फराळवाटप, सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत प्रसादवाटप होणार आहे.

२. २२ जानेवारी या दिवशी सकाळी रामायणकथा समाप्तीनंतर १० वाजता होम-हवन,  ११ ते ११.३० वाजता महाआरती, दुपारी १२ ते २ या वेळेत श्री प्रभुरामाच्या प्रतिमेची रथयात्रा (फळ मार्केट आणि भाजी मार्केट), दुपारी १२.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद असेल.

कार्यक्रमाचे आयोजक घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ, अग्रहरी समाज विकास सेवा संस्था, उडान सामाजिक संस्था हे आहेत.

मसाला मार्केटमध्ये मार्केटचे संचालक आणि युवा सेवा संघ ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये १६ ते २१ जानेवारीपर्यंत भजन, त्यानंतर ६.३० वाजता महाआरती होणार आहे. २२ जानेवारीला दुपारी २ ते ४ सुंदरकांड पाठ, ५६ भोग दर्शन, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कांदा-बटाटा बाजारपेठेमध्ये महाआरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय पिंगळे यांनी दिली.