परिपूर्ण आणि एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘केवळ हिंदु धर्माच्या ग्रंथांत विश्वाची रचना, अणू-परमाणू, अदृश्य सृष्टी, पाप-पुण्य, वाईट शक्तींचा त्रास कसा दूर करायचा, ईश्वरप्राप्ती कशी करायची इत्यादींची संपूर्ण माहिती दिली आहे. इतर काही धर्मांत त्यांचा उल्लेख असल्यास केवळ तो शब्दापुरता केला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लोहिया मातृमंदिर शाळेकडून ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ असे २ विक्रम !

‘डी.ई.एस्. पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळे’च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गीतरामायणातील ३० प्रसंग नृत्य, नाट्य आणि संगीत यांच्या माध्यमातून अवघ्या ३ घंट्यांत उलगडले !

पवित्र अयोध्येला मद्य-मांसमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

आज देशात अनेक तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या नावावर मद्यालये आणि मांस यांची दुकाने उघडण्यात आली आहेत. ती बंद करणे आवश्यक आहे. याप्रमाणेच हिंदूंसाठी परमपवित्र असलेल्या अयोध्येला संपूर्ण मद्य-मांसमुक्त करण्यात यावे, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.

जपानच्या कोयासन विद्यापिठाकडून आयोजित पदवीदान समारंभात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्रदान !

या विद्यापिठाकडून अशी पदवी मिळणारे फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत. कोयासन विद्यापिठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचालक पद ५ वर्षांपासून रिक्त !

राज्यात शासकीय महाविद्यालये चालू करण्यासह वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत !

गळ्याला पतंगाचा मांजा लागून पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू !

मुंबई उच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजावर बंदी आणूनही प्रशासन त्यावरील कारवाई वेळीच का करत नाही ?

इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

महापालिका, नगरपालिका, तसेच ज्या स्थानिक संस्था यांनी यावर उपाययोजना न काढल्यानेच ही समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे जो प्रत्येक घटक नदी प्रदूषणासाठी उत्तरदायी आहे, त्यांच्यावर आता कठोर कारवाईच अपेक्षित आहे !

सातारा जिल्ह्यातील शिधा वाटप दुकाने १ जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी बंद !

असे बंद पाळण्याची वेळ का येते ? यामुळे होणार्‍या जनतेच्या गैरसोयीचे दायित्व कुणाचे ?

मौर्य यांच्यासारख्यांना कारागृहात कधी डांबणार ?

‘पंतप्रधान मोदी यांनी ‘हिंदु कोणताही धर्म नाही’, असे म्हटले होते, तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत; मात्र मी असे विधान केल्यावर भूकंप होतो’, असे द्वेषमूलक विधान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.