गळ्याला पतंगाचा मांजा लागून पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू !

उजवीकडे श्री. सुरेश जाधव

मुंबई – कामावरून दुचाकीने घरी परततांना पोलीस कर्मचारी सुरेश जाधव यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. उपचारासाठी त्यांना शीव रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

संपादकीय भूमिका

मुंबई उच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजावर बंदी आणूनही प्रशासन त्यावरील कारवाई वेळीच का करत नाही ?