संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाने २ प्राध्‍यापकांना लाचखोरी प्रकरणी बडतर्फ केले !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्‍या विविध विभागांत कार्यरत असलेल्‍या ३ प्राध्‍यापकांची चौकशी चालू होती. यात पीएच्.डी. प्रकरणी विद्यार्थ्‍यांकडून पैसे घेणार्‍या डॉ. उज्‍ज्‍वला भडांगे, तर डॉ. नीरज साळुंखेे यांना वर्ष २०१३ मध्‍ये निलंबित केले होते.

भाजपच्‍या महिला नेत्‍याला बलात्‍काराची धमकी देणार्‍या समाजवादी पक्षाच्‍या नेत्‍याला अटक

समाजवादी पक्षाच्‍या ट्‍विटर हँडलचे सदस्‍य मनीष अग्रवाल यांनी सामाजिक माध्‍यमांवरून भाजपच्‍या युवा मोर्चाच्‍या प्रसिद्धीमाध्‍यम प्रमुख ऋचा राजपूत यांना जिवे मारण्‍याची आणि बलात्‍कार करण्‍याची धमकी दिली.

कॉ. पानसरे हत्‍या प्रकरणात १० संशयितांवर दोष निश्‍चित : संशयितांकडून दोष अमान्‍य !

या खटल्‍यात एकूण १२ संशयित असून त्‍यांतील २ संशयित पसार आहेत, असे सरकार पक्षाचे म्‍हणणे आहे. वरील १० संशयितांपैकी समीर गायकवाड हे सध्‍या जामिनावर आहेत.

म्हादईप्रश्नी अधिवेशनात पूर्ण दिवस चर्चेसाठी सरकार ठराव मांडणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘राज्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर कोणतेही बंधन नाही; परंतु म्हादईचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संयम बाळगावा लागेल. सरकारच्या विरोधात निदर्शने होत आहेत आणि आम्ही प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.’’

नाशिक येथे १० वर्षीय विद्यार्थिनीसमवेत गैरवर्तन करणार्‍या शिक्षकावर गुन्‍हा नोंद !

सिडको भागातील पेठे विद्यालयातील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक रवींद्र नाकील यांनी १० वर्षीय विद्यार्थिनीसमवेत शाळेतच गैरवर्तन केले.

नंदुरबार येथील दंडपाणेश्‍वर गणेश मंदिर आणि जैन मंदिर येथे चोरी !

शहरातील प्रसिद्ध जागृत देवस्‍थान श्री दंडपाणेश्‍वर मंदिरातील गणेश मूर्तीवरील २ किलो चांदीचे आभूषण, तसेच ४ दानपेट्या फोडून त्‍यातील रोख रक्‍कम चोरांनी पळवली, तर साक्री रोडवरील जैन मंदिरातील दानपेटी फोडून २५ सहस्र रुपये चोरले. या प्रकरणी तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

परदेशी विद्यापिठांमुळे उच्‍च शिक्षणामध्‍ये दरी निर्माण होण्‍याची भीती ! – शिक्षणतज्ञांचे मत

परदेशी विद्यापिठांना मुक्‍तद्वार (प्रवेश) दिल्‍यास देशातील उच्‍च शिक्षण आणि उच्‍च शिक्षण संस्‍थांवर विपरित परिणाम होणार असल्‍याचे मत शिक्षणतज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.

सोलापूर येथील प्राणी संग्रहालयाच्‍या मान्‍यतेसाठी नव्‍याने पाठवला प्रस्‍ताव !

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण पथकाने मागील सप्‍ताहात ‘महात्‍मा गांधी प्राणी संग्रहालया’ची पडताळणी केली असून असुविधा आणि निकष लागू होत नसल्‍याने केंद्रीय समितीने प्राणी संग्रहालयाची मान्‍यता रहित केली होती. रहित केलेली मान्‍यता पुन्‍हा मिळवण्‍यासाठी महापालिकेचा पाठपुरावा चालू आहे.

पाकिस्‍तान येथे सातत्‍याने होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍यांविषयी भारताने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर आवाज उठवावा !

झारखंड राज्‍यातील सम्‍मेद शिखर या जैन समाजाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत पवित्र असलेल्‍या धर्मस्‍थळाला तीर्थक्षेत्र घोषित करावे आणि पाकिस्‍तान येथे सातत्‍याने होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍यांविषयी भारताने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर आवाज उठवावा, या मागणीसाठी ८ जानेवारी या दिवशी स्‍थानिक दत्त चौक येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन घेण्‍यात आले.

हिंदूंना स्‍वतःचे अस्‍तित्‍व टिकवण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची मागणी हाच पर्याय ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

अनेक आक्रमकांच्‍या सत्तेमुळे काही काळ हिंदुत्‍वाची विचारधारा दाबली गेली असली, तरी आज स्‍वतःचे अस्‍तित्‍व टिकवण्‍यासाठी हिंदूंनी हिंदु राष्‍ट्राची मागणी एकमुखाने केली पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्‍यक आहे, असे वक्‍तव्‍य हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले.