पाकिस्‍तान येथे सातत्‍याने होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍यांविषयी भारताने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर आवाज उठवावा !

यवतमाळ येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनातील मागणी

आंदोलनात घोषणा देतांना धर्मप्रेमी

यवतमाळ, ९ जानेवारी (वार्ता.) – झारखंड राज्‍यातील सम्‍मेद शिखर या जैन समाजाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत पवित्र असलेल्‍या धर्मस्‍थळाला तीर्थक्षेत्र घोषित करावे आणि पाकिस्‍तान येथे सातत्‍याने होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍यांविषयी भारताने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर आवाज उठवावा, या मागणीसाठी ८ जानेवारी या दिवशी स्‍थानिक दत्त चौक येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन घेण्‍यात आले.

या आंदोलनात जैन संघटना, योग वेदांत सेवा समिती, हिंदु महासभा, शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, शिवतीर्थ मित्र मंडळ, सनातन संस्‍था, हिंदु जनजागृती समिती इत्‍यादी संघटना सहभागी झाल्‍या होत्‍या. आंदोलनामध्‍ये हिंदु महासभेचे श्री. लक्ष्मणलालजी खत्री, ‘अभय टाइम्‍स’चे संपादक अभय पापळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल यांनी मार्गदर्शन केले.