‘समृद्धी’वरील अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेगावर आता १५ ‘इंटरसेप्टर’ वाहने !

नियमाचे उल्लंघन करणार्‍यांकडून ऑनलाईन दंड वसूल केला जाईल. वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्यास ही यंत्रणा काम करेल.

आजपासून ओझर (जिल्हा पुणे) येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ ! 

‘प्राचीन भारतीय मंदिर संस्कृती’चे रक्षण होण्यासाठी सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्हावे, मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाय काढणे, तसेच मंदिरांचे सुप्रबंधन व्हावे, या उद्देशाने २ आणि ३ डिसेंबर या दिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरातील विविध मंदिरांचे विश्वस्त, पुजारी आणि प्रतिनिधी यांचे ओझरकडे उत्साहात प्रयाण ! 

ओझर येथे होत असलेल्या द्वितीय मंदिर न्यास परिषदेसाठी राज्यातून अमरावती, सोलापूर, बीड, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, रत्नागिरी, मुंबई, नागपूर यांसह जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून विविध मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी मोठ्या उत्साहात विविध गाड्यांमधून ओझरकडे प्रयाण केले.

प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याची नारायण राणेंची मागणी !

दंगलीची माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना ‘६ डिसेंबरनंतर दंगली होतील’, असे वक्तव्य केले होते.

२० दिवसांनंतर डॉ. विनायक काळे यांचा पुणे येथील ‘ससून’च्या अधिष्ठातापदी तात्पुरत्या नियुक्तीचा आदेश !

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रहित करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दत्ता दळवी यांना जामीन संमत !; गिरगाव येथे पहिल्या क्यू.आर्. कोड चौकाचे उद्घाटन !…

मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांची मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर १ डिसेंबर या दिवशी सुटका केली.

नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन !

आतंकवादी आणि नक्षलवादी आतून कसे मिळालेले आहेत ?, याचा हा आणखी एक पुरावा ! सरकारने नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करणे, हेच त्याचे उत्तर आहे !

प्रदूषणामुळे ६० टक्क्यांहून अधिक नागरिकांचा मुंबई आणि देहली ही शहरे सोडण्याकडे कल !

कुठे सहस्रो वर्षांपासून पृथ्वी प्रदूषणमुक्त ठेवणारी भारतीय संस्कृती, तर कुठे अवघ्या १०० वर्षांत पृथ्वी प्रदूषणग्रस्त करणारे आधुनिक विज्ञान !

पीकविमा आस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्याकडून समज !

राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हानीभरपाई द्यावी, अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ, अशी चेतावणी त्यांनी राज्य सरकारला दिली.