छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील प्रतापपूर जंगलात लावले फलक !
गडचिरोली – छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील प्रतापपूर जंगलात नक्षलवाद्यांनी २ लाल फलक लावून ‘हमास’ या आतंकवादी संघटनेला पाठिंबा दिला. या फलकावर लिहिले आहे की, हमास ही आतंकवादी नव्हे, तर पॅलेस्टाईनमधील जनतेच्या मुक्ततेसाठी संघर्ष करणारी संघटना आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनला समर्थन देऊन त्यांचे हात मजबूत करा’, असे आवाहन करणारे फलक नक्षलवाद्यांनी लावले आहेत.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या वेळी नक्षलवाद्यांनी भाजपच्या काही समर्थकांची हत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातही लागोपाठ तिघांची हत्या केली. त्यामुळे २ ते ८ डिसेंबर या काळात हिंसक कारवाया केला जाणार्या ‘पीएल्जीए’ या त्यांच्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात भीतीचे वातावरण आहे.
संपादकीय भूमिका
|