ओबीसी नेत्‍यांमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मनोज जरांगे म्‍हणाले की, मराठा समाजातील जी व्‍यक्‍ती शेती करते, जिला आरक्षणाची आवश्‍यकता आहे. जिच्‍याकडे कुणबीचे पुरावे आहेत, जिला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे.

राज्‍यातील हवामानात सातत्‍याने पालट !

अरबी समुद्रात अल्‍प दाबाचा पट्टा सिद्ध झाल्‍यामुळे वातावरणात सातत्‍याने पालट होत आहेत. दिवसभर ऊन असते, तर पहाटे आणि रात्री थंडीचे प्रमाण वाढते. काही जिल्‍ह्यांमध्‍ये पाऊस पडण्‍याची शक्‍यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

वाढते प्रदूषण रोखण्‍यासाठी राज्‍य सरकारकडून उपाययोजना !

राज्‍यात अनेक शहरांमध्‍ये प्रदूषणाची पातळी वाढल्‍याने नागरिकांच्‍या आरोग्‍याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचे आरोग्‍य जपण्‍यासाठी पुढील उपाययोजना चालू केल्‍या आहेत

‘हमास’ या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करा ! – बापू ढगे, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ

पॅलेस्‍टाइनच्‍या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणार्‍यांवर आणि आंदोलने करणार्‍यांवर ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या’अंतर्गत कठोर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. बापू ढगे यांनी केली.

अखेर शिंदे समितीचा मराठवाड्यातील मराठा आरक्षणाविषयीचा अहवाल सिद्ध !

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्‍या शिंदे समितीच्‍या आदेशानुसार मराठवाड्यातील ८ जिल्‍ह्यांचे अहवाल आता सिद्ध झालेले आहेत. याविषयी ९ नोव्‍हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता मराठवाड्याचे विभागीय आयुक्‍तांनी अत्‍यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

परदेशी चलनाच्‍या तस्‍करी करणार्‍या टांझानियातील धर्मांधाला अटक !

गुन्‍हेगारीत भारतातील, तसेच विदेशातीलही धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्‍या ! पोलिसांनी अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्‍याविना गुन्‍हेगारीवर नियंत्रण येणार नाही !

महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक जिल्‍ह्यात दूरदृश्‍यप्रणालीद्वारे ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमांचे उद़्‍घाटन !

महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक जिल्‍ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ चालू करण्‍यासाठी ८ नोव्‍हेंबर या दिवसाच्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते दूरदृश्‍यप्रणालीद्वारे मंत्रालयामध्‍ये या कार्यक्रमांचे उद़्‍घाटन झाले.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाकरता ५३० कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी ? – सजग नागरिक मंच

अधिक व्‍याजदराचे कर्ज काढणे म्‍हणजे नागरिकांनी ‘करा’पोटी भरलेल्‍या पैशांचा अपव्‍यय नाही का ? असे करण्‍यामागचे कारण पुणे महापालिका प्रशासन स्‍पष्‍ट करील का ?

सौरभ चंद्राकर याच्‍यासह ३१ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

मुंबई पोलिसांनी पहिल्‍यांदाच ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’चा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्‍यासह ३१ जणांविरोधात गुन्‍हा नोंदवला आहे.

राज्‍यातील व्‍यावसायिक महाविद्यालयांना अतिरिक्‍त शुल्‍क न आकारण्‍याच्‍या सूचना !

महाविद्यालयांनी अशा प्रकारे अतिरिक्‍त शुल्‍क का आकारले, हेही पहाणे आवश्‍यक आहे ? अतिरिक्‍त शुल्‍क आकारल्‍याविषयीही दंड ठोठावावा !